एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. उद्धव ठाकरेंना सकाळी 7.45 मिनिटांनी रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले.
नियमित तपासणीसाठी (रुटीन चेकअप) उद्धव ठाकरे यांना बुधवारी सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती ट्विटरवर दिली. "उद्धव ठाकरेंचं रुटीन चेकअप झालं. तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत," असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर सांगितलं.
https://twitter.com/AUThackeray/status/730600494201241601
यापूर्वी 2012 मध्ये उद्धव यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी राज ठाकरेही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तसंच त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं.
संबंधित बातम्या
उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात अॅडमिट
उद्धव ठाकरेंना आज मिळणार डिस्चार्ज
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्री लीलावतीत
उद्धव ठाकरेंवरील अँजिओप्लास्टी यशस्वी
राज यांनी ‘मातोश्री’वर जाऊन केली उद्धवची विचारपूस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement