एक्स्प्लोर
.. तर याद राखा, उदयनराजेंचा आणेवाडी टोल प्रशासनाला इशारा
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढलं तर अंदोलन करु, असा इशारा यावेळी उदयनराजेंनी दिला.

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आणेवाडी टोलनाक्यावरील व्यवस्थापनाला चांगलंच सुनावलं. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढलं तर अंदोलन करु, असा इशारा यावेळी उदयनराजेंनी दिला. सध्या असलेल्या व्यवस्थापनाकडून दुसऱ्या व्यवस्थापनाकडे हा टोल नाका जाणार आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढून नवी भरती होणार आहे. याला सध्याच्या टोल कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळेच खासदार उदयनराजेंनी टोल कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन, टोल प्रशासनाला चांगलंच सुनावलं. थेट उदयनराजेंनी टोलनाक्यावर एण्ट्री केल्याने, सातारा-पुणे महामार्ग जॅम झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























