![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Uddhav Thackeray on PM Modi : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर सडकून प्रहार
Uddhav Thackeray on PM Modi : हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, यांना गाडायचं असेल आत्ताच गाडा, देणार साथ त्याचा करणार घात अशी प्रवृत्ती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
![Uddhav Thackeray on PM Modi : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर सडकून प्रहार u calling Fake Shiv Sena is that your degree Uddhav Thackeray hits out at PM Modi in Palghar amit shah bjp sharad pawar Uddhav Thackeray on PM Modi : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर सडकून प्रहार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/9531e05fe32c5ff48689a7f4f72f9a251712927830964736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : विश्वगुरु म्हणता आणि प्रत्येक भाषण उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय यांचं भाषण पूर्ण होत नाही, नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदींवर घणाघाती प्रहार केला. पालघरमध्ये जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी आणि अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, यांना गाडायचं असेल आत्ताच गाडा, देणार साथ त्याचा करणार घात अशी प्रवृत्ती असल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, इकडे फणा काढून बसतात आणि तिकडे चीनकडे शेपूट घालून फिरतात. तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भाजप सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात. भारत माता माझी माता आहे, मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही, तर गोव्याच्या बाहेर लावा नाहीतर गुजरातीत परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये. एक माणूस सगळ्यांना गुलाम बनू शकतो? अशी विचारणा त्यांनी केली.
तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो
त्यांनी सांगितले की,मला अभिमान आहे माझ्या आई-वडिलांचा मला अभिमान आहे. मोदींना मी सांगतो, एका व्यासपीठावर येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवर सोडा मग खेळ नाही करायचा. लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे, एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील नाही, तर लोक मला घरी पाठवतील. मला जनतेचा फैसला मला मंजूर आहे. त्यांनी सांगितले की, ईडी, इन्कम टॅक्स वाले यांचे घरघडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावत आहेत. पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झाला. माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता, खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तर तुरुंगात टाकला आणि त्याच कंपनीचा मालक आहे तो मिंध्यांकडे गेला तो मोकाट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)