एक्स्प्लोर
विद्यार्थींनीचं लैंगिक शोषण, दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अमोल क्षीरसागर आणि यश बोरूंदीया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावं आहे. या दोन्ही शिक्षकांकडून मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार शाळेच्या विद्यार्थिंनीनी केली. हा धक्कादायक प्रकार समजताच संतप्त पालकांनी संपूर्ण शाळेला घेराव घातला. दरम्यान, शाळेचे संस्थाचालक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून होतो आहे. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. तसंच शाळेचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
विश्व























