एक्स्प्लोर
सोलापूरात उजनीच्या कालव्यात बुडून दोन लहान भावंडांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील बोरगावमध्ये उजनीच्या उजव्या कालव्यात चार शाळकरी मुलं वाहून गेली आहेत. यात दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेले दोघे भाऊ मुंबईहून श्रीपूर येथे उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आले होते. मात्र पोहता न आल्यानं मामासोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ओम सतीश लोणी (वय 13) व प्रसन्न सतीश लोणी (वय 10) अशी मृत भावंडांची नावं आहेत. कालव्यात वाहून गेलेल्या विराज संतोष शिवनगी व विकी संतोष शिवनगी या दोघांना बोरगांव वाचवण्यात यश आलं आहे. बुडालेल्या दोन्ही भावंडांचे मृतदेह अद्याप सापडले नसून त्यांचा शोध सुरु आहे.
Before You Go
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















