एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंचा आणखी एक झटका, भांडार अधिकारी निलंबित
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPML चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. तुकाराम मुंढे यांनी आज कामात दिरंगाई करणाऱ्या भांडार अधिकाऱ्याला निलंबित केलं.
चंद्रशेखर कदम असं निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.
कदम यांच्यावर सुट्या भागांचा ( spare part ) पुरवठा वेळेत न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
PMPML च्या नादुरुस्त असलेल्या 400 बस तातडीने रस्त्यावर आणण्याचं ध्येय तुकाराम मुंढे यांचं आहे. त्यासाठी त्याने जोमाने सुरुवात केली आहे. या कामात जो कोणी ढिलेपणा करेल, त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.
सूत्रं स्वीकारताच पहिला झटका
तुकाराम मुंढे यांनी 29 मार्चला PMPML चा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी कामचुकार कामगारांवर कारवाई सुरु केली. दोनच दिवसात म्हणजे 1 एप्रिलला त्यांनी पहिला झटका दिला.
रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी झोपल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. मात्र ही डुलकी या कर्मचाऱ्यांना महागात पडली. या 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले.
शहरात एकूण 13 डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते. त्यासाठी त्यांनी भरारी पथकं नेमली आहेत.
महापौरांना झटका
महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणूक शुक्रवारी 7 एप्रिलला होती. त्यासाठी तुकाराम मुंढे यांची पीठासीन आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी महापौर, उपमहापौर, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतात. अशी महापालिकेची परंपरा आहे.
तुकाराम मुंढे यांनी मात्र समीतीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांशिवाय इतरांना उपस्थित राहण्यास मनाई केली. त्याला नगरसेवकांनी हरकत घेतली. त्यानंतर महापौर आणि गटनेत्यांना उपस्थित राहण्यास मुंढे यांनी परवानगी दिली. मात्र, या सर्वांना बाजूला एका कोपर्यात बसावं लागेल, असं मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत येऊनही महापौर मुक्ता टिळक यांनी या निवडणुकीला जायचं टाळलं.
संबंधित बातम्या
तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीच्या कारभाराचा पुण्याच्या महापौरांना झटका !
ऑन ड्युटी झोपलेल्या 9 कर्मचाऱ्यांचं निलंबन, तुकाराम मुंढेंचे आदेश
तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
तुकाराम मुंढेंचा धडाका सुरु, PMPML च्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे
तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार?
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement