एक्स्प्लोर

ट्रकची समोरासमोर धडक, ड्रायव्हर जागेवर जळाला!

गोंदिया : देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मसूलकशा घाटाजवळ आज सकाळी झालेल्या ट्रकच्या अपघातात एक ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला, तर दुसऱ्या ट्रकमधील चालक आणि क्लीनरने अपघात होताच घटना स्थळावरून पळ काढला. नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची आणि रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकची एकमेकांना धडक झाली. अपघात इतका भीषण होता की धडक होताच ट्रकला आग लागली. रायपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकमध्ये विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर असल्याने ट्रकने अपघात होताच अचानक पेट घेतला. ट्रकचालक हा ट्रकमध्ये एकटाच असल्याने आणि त्याचा पाय स्टेरिंगमध्ये अडकल्याने ट्रकमधून बाहेर पडता आले नसल्याने आग लागतचाच ट्रकचा चालक जिवंत जाळला, तर आग लागण्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहातूक दोन तास थांबली. दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. घटनास्थळापासून देवरी तालुका हा 5 किलो मीटर अंतरावर आहे. देवरी नगर पंचायत राष्ट्रीय महामार्गावर असून नगर पंचायतीकडे अग्निशमन दलाची गाडी नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अशी घटना घडल्यास गोंदियावरुन 70 किलोमीटरचा अंतर ओलांडून अग्निशमन दलाचे बंब बोलावून आग विझवावी लागते. नागरिकांनी देवरी नागरपंचायतीला अग्निशमन दलाची गाडी ठेवण्याची मागणी केली आहे. जर आज देवरी नगरपंचायतीकडे अग्निशमन दलाचे बंब असते तर कदाचित ट्रकचालकाचा जीव वाचवता आला असता. दरम्यान, ट्रक पूर्ण जळाल्याने ट्रकचालकाची ओळख पटू शकली नाही. उशिरा पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीने उर्वरित आग विझवली. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget