एक्स्प्लोर

Dhangar Reservation : मराठा-ओबीसीनंतर नंतर आता धनगर-आदिवासी वाद उफाळणार? धनगरांच्या ST आरक्षणाला आदिवासी आमदारांचा विरोध

Tribal MLA Opposed Dhangar Caste ST Reservation : धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण दिल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशी भूमिका आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली आहे. 

मुंबई : राज्य सरकार धनगर आरक्षणाच्या अनुषंगाने जीआर काढण्याची शक्यता लक्षात घेता आता आदिवासी समाजाने सरकारला विरोध करायला सुरुवात केल्याचं दिसतंय. त्यामुळे राज्यात आता ओबीसी-मराठा नंतर धनगर-आदिवासी वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात राज्यातील सर्व आदिवासी आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला या आमदार राजेश पाटील, विनोद निकोले, किरण लहामटे, राजेश पाडवी, शिरीष नाईक, काशिनाथ पावरा, आमशा पाडवी, के सी पाडवी, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार सुनिल भुसारा उपस्थित होते. या बैठकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारने जीआर काढल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा केलेली आहे. आजच्या बैठकीत आगामी काळातील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. 

तर आदिवासी आमदार राजीनामे देतील

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शविला. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने धनगर आणि धनगड हे वेगळे आहे, असे सांगूनही राज्य सरकार आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून धनगर आरक्षणाचा जीआर काढत आहे. मात्र, सरकारने लक्षात घ्यावे की, राज्यात धनगर समाजाचे 60 ते 65 आमदार आहेत. जर सरकारने जीआर काढला तर सर्व आदिवासी आमदार राजीनामा देतील, असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला. 

नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघात 60 ते 70 हजार ही आदिवासी मतं आहेत. सरकारसाठी आम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर खूप जड जाईल. धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. जर आंदोलन करून निर्णय शकणार असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करू, असे खोसकर यांनी म्हटले. यावेळी हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाले होते.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानंSharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्यJob Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Embed widget