एक्स्प्लोर

पाच तासांच्या थरारानंतर विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या हौशी पर्यटकाची सुटका

किल्ल्याचा पहिला टप्पा सर ही केला, पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. पुढं बाहेर पडल्यानंतर पाहिल्यावर त्यांना किल्ल्याचा बुरुज दिसला आणि बुरुंजाच्या दिशेने मार्गस्थ झाले.

लोणावळा : लोणावळ्याजवळच्या विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. अमर कोरे असं सुटका केलेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. मार्ग माहित नसतानाही 8 ते 10 तरुणांनी भाजे लेण्याच्या बाजूने विसापूर किल्ल्याची चढाई सुरु केली. पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. तीव्र चढावरच्या एका ठिकाणी अमर अडकला. पण तब्बल 5 तास अडकून पडल्यानंतर शेवटी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं. VIDEO | पाच तासांच्या थरारानंतर विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या हौशी पर्यटकाची सुटका | लोणावळा | ABP Majha हौशी पर्यटकाच्या सुटकेटचा थरारक घटनाक्रम अमर कोरेसह 8 ते 10 हौशी तरुणांनी भाजे लेणी कडून विसापूर किल्ल्याची चढाई सुरु केली. गप्पांच्या नादात किल्ला दिसतोय म्हणून तरुणांनी आगेकूच केली. पहिला टप्पा सर ही केला, पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. कसंबसं पुढं बाहेर पडले, वर पाहिल्यावर त्यांना किल्ल्याचा बुरुज दिसला. मागचा-पुढचा विचार न करता ते बुरुंजाच्या दिशेने मार्गस्थ झाले. पण ही तीव्र चढाई अमरला काही झेपली नाही. तो अशा ठिकाणी अडकला तिथून न वर चढू शकत होता, न खाली उतरू शकत होता. पाय घसरला तर तो थेट खोल दरीत पडण्याची भीती होती. अमरच्या मित्रांनी अर्धा तास त्याला वर घेण्याचे प्रयत्न केले. पण त्याला वर येता न आल्यानं तिकडेच अडकून पडला. नंतर ग्रुपमधील कौशिक पाटील या मुलाने शिवदुर्ग रेस्क्यू टीमचा नंबर मिळवला आणि ही बाब कानावर टाकली. व्हाट्सऍपवर घटनास्थळ स्पष्ट होईल असे व्हिडीओ शिवदुर्ग ने मागवले. मग शिवदुर्गाच्या व्हाट्सऍप ग्रुपवर मेसेज टाकून बचावकार्याला टीम सज्ज करण्यात आली. घटनास्थळाच्या परिसरात टीम सदस्य सागर कुंभार तातडीनं मार्गस्थ झाला आणि अडकलेल्या अमरला पकडून ठेवलं. कौशिकच्या फोननंतर साधारण दीड तासात टीम घटनास्थळी पोहचली. बचावकार्य सुरु झालं, पण दमदार पावसाने हजेरी लावली. अशात कोणतीही तमा न बाळगता टीमधील विकास मावकरने खाली उतरायची तयारी दर्शवली. दोरी आणि हार्नेसच्या साह्याने विकास कसाबसा अमरजवळ पोहचला. अमरलाही हार्नेस देण्यात आलं. मग सागर आणि विकास त्याला दोरीच्या साह्याने वर घेऊन आले. अशा रीतीने या हौशी पर्यटकाची तब्बल पाच तासाने सुखरूप सुटका झाली. अमरने शिवदुर्ग टीमचे आभार मानले. त्यामुळे हौशी पर्यटकांनी यातून धडा घ्यावा आणि पर्यटनस्थळांची अपुरी माहिती घेऊन पर्यटन करण्याचं धाडस करु नये.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget