एक्स्प्लोर
राज्यातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याचं लातुरात भूमीपूजन
मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं.
लातूर : महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याचं लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने गोंधळ सुरू केला. मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं.
रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
पहिल्या टप्प्यात प्रति वर्ष 250 डब्यांचं उत्पादन
दुसऱ्या टप्प्यात प्रति वर्ष 400 डब्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढवणे
जमीन क्षेत्र : 153.88 हेक्टर
अपेक्षित खर्च : 500 कोटी रुपये
ठिकाण : हरंगूल स्टेशनपासून 2.5 किमी अंतरावर
रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) द्वारे कारखाना बांधण्यात येईल
भूसर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे.
फॅक्टरी लेआऊट विकसित
25 ते 30 हजार रोजगाराच्या संधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement