एक्स्प्लोर
मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक पोलिसांची ‘गांधीगिरी’
अलिबाग (रायगड) : मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक पोलिसांची ‘गांधीगिरी’ पाहायला मिळते आहे. ‘विनाहेल्मेट’ गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर ‘प्रबोधनात्मक’ कारवाई सुरु करण्यात आली आहे. सुमारे एक हजारपेक्षा अधिक मोटारसायकल चालकांना पोलिसांनी प्रबोधनात्मक सल्ला दिला आहे. आता रविवारपासून विनाहेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा हायवे हा 'अपघातां'चा हायवे मानला जातो. या महामार्गावरील अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने पुढाकार घेतला असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या मोटारसायकलस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी आज 'गांधीगिरी'चा मार्ग अवलंबत मोटारसायकल चालकांचं प्रबोधन केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये मोटारसायकलस्वारांचे अधिक अपघात झाले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यातच सध्या सुट्ट्या असल्याने अनेक पर्यटक हे कोकणात पर्यटनासाठी येत असून वाहतूककोंडीला पर्याय म्हणून मोटारसायकलवर प्रवास करण्यास पसंती देतात.
यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकांवर 'गांधीगिरी'च्या माध्यमातून कारवाई करत विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हेल्मेट घालून येण्याचा सल्ला देण्यात आला. यामध्ये कोणतीही दंडात्मक कारवाई न करता या मोटारसायकल चालकांना थांबवून त्यांना हेल्मेटचे महत्व समजावून प्रबोधन करण्यात आले.
आज सकाळपासून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एक हजारपेक्षा अधिक 'विनाहेल्मेट' प्रवास करणाऱ्या मोटारसायकलस्वारांना हेल्मेट घालून प्रवास करण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला असून, उद्या पासून मुंबई गोवा हायवेवर 'विना हेल्मेट' प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement