Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक तुंबली; वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटरची रांगा
Mumbai Pune Expressway : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेतला तात आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून, त्या मार्गावरून पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात आहे.
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे द्रुतगती महार्गावर (Mumbai-Pune Expressway) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या वाढ झाल्याने बोरघाटात वाहतूक प्रचंड मंदावली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आलेले बांधव आपापल्या गावी परतत असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. मराठा आंदोलक घरी परतून जात असतानाच आठवड्याचा शेवट असल्याने सुद्धा द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. सध्या वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. वाशी नवी मुंबईत लाखो मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात गर्दी केली होती. आंदोलन स्थगित करण्यात आल्याने मराठा आंदोलक परतीच्या वाटेवर आहेत.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेतला तात आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून, त्या मार्गावरून पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात आहे. या ब्लॉकद्वारे महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील तासाभरात ही वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावा महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मराठा आंदोलक परतले
दुसरीकडे, मराठा आरक्षणप्रश्नी वाशी मुंबईत तळ ठोकलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन त्याच ठिकाणी स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत जरांगे यांना ज्यूस देत उपोषण सोडवले. यावेळी सभा सुद्धा पार पडली. यानंतर जरांगे यांनी सुद्धा आंदोलन स्थगित केलं असलं, तरी सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशात काही बदल झाल्यास पुन्हा मुंबईत येऊन आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या