एक्स्प्लोर

Top Headlines Today : जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी 

National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

खासदार नवनीत राणा आज 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार
स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे उपचार घेत असलेल्या खासदान नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्या सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा वाद वाढल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही 12 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्या ठिकाणाहून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास सुरू झाला आणि त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी त्यांच्या भेटीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार गेले होते. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अयोध्या दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांनी बोलू नये, राज ठाकरेंची सूचना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरेंनी सूचना केली आहे. अयोध्या दौऱ्याबाबत कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, पक्षाने नेमलेल्या प्रवक्त्यांनीच माध्यमांशी बोलावं, प्रवक्त्यांनीही जबाबदारीनं बोलावं आणि भाषेचं भान राखावं अशा सूचना राज ठाकरेनी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. 

शरद पवार आणि अजित पवार दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर
दिनांक 9 मे रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यामध्ये जाणार आहेत. शरद पवार उद्या दुपारी साताऱ्यात पोहोचणार आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ते भाग घेतील. 

भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी
भारतीय पुरातत्व विभागाचे पथक विठ्ठल मंदिरात दाखल झालं असून ते विट्ठल रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पाहणी करणार आहे. ‘माझा’च्या बातमीनंतर शासन सक्रिय झालं. पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची आज पहाटे 3 वाजता पाहणी करण्यात येणार आहे. चार जणांचे भारतीय पुरातत्व पथक पंढरपूरमध्ये शनिवारी दाखल झालं आहे.  

विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणांची झीज झाल्याने दोन वर्षापूर्वी वज्रलेप केला होता. पण खूप कमी कालावधीत हा लेप निघाल्याचे दिसून आले. पहाटे पुरातत्व विभागाचे चार जणांचे पथक वज्र लेप निघालेल्या ठिकाणची पाहणी करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

राष्ट्रपती आज नागपुरात, IIM च्या कँपसचे लोकार्पण करणार 
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कँपसच्या लोकार्पण समारंभासाठी नागपुरात येत आहेत. मिहान परिसरात आयएआयमच्या सभागृहात सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.   
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात
मराठी दैनिक लोकमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नागपुरात येत आहेत. महानगरपालिकेच्या भट सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची चिन्हं
बंगालच्या उपसागरातील वादळाचे आज चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील वादळ हे आज संध्याकाळी 75 किमी प्रति तास वेगाने येत वाहत असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे वादळ आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाहत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्याला ‘असानी’ असं नाव देण्यात येईल. 

आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन सामने पार पडणार आहेत. यातील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Sunrisers Hyderabad vs Royal challengers bangalore) या दोन संघात होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता होणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात दोघांचा फॉर्म यंदा समसमान असल्यान आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.

सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. 



 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा

व्हिडीओ

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Embed widget