एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 03 ऑगस्ट 2022 : बुधवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत निर्णयाची शक्यता, आयोगाच्या नोटीशीचंही भवितव्य ठरणार

2. पुण्यात बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक, अंत पाहू नका, उदय सामंत यांची प्रतिक्रिया 

3. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला; रात्रभर पोलिसांकडून धरपकड, हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरातांना पुणे पोलिसांकडून अटक

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये 'शिवसंवाद' यात्रा आयोजित करण्यात आली होती. यासाठी हजारो शिवसैनिकांची गर्दी झाली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आधीच उदय सामंत हे मंदिरात जात असताना काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी गद्दार..गद्दारच्या ही घोषणा देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर, पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. 

4. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल, दिघेंच्या मित्रानं बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप, तर, तक्रार करू नये म्हणून केदार दिघेंनी धमकावल्याचाही आरोप

5. शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अमित शाहांकडे मागणी 

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 03 ऑगस्ट 2022 : बुधवार

6. मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजी आणि पीएनजी महागला, 6 रुपयांच्या दरवाढीनंतर सीएनजी 86 रुपयांवर तर 4 रुपयांच्या दरवाढीनंतर पीएनजी 52 रुपयांवर

सातत्यानं वाढणाऱ्या महागाईनं सर्वसामान्य बेजार झाले आहेत. पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता सीएनजीच्या किमतीही कडाडल्या आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG Price Hike) दरांमध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो 6 रुपयांनी वाढवले आहेत. तर पीएनजीच्या दरांमध्ये किलोमागे 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीचे दर 86 रुपये प्रतिकिलोवर, तर पीएनजीचे दर 52.50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. 

7. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. तर, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या विदर्भात केंद्रीय पथकाकडून पाहणी

8. मंकीपॉक्स विषाणूवर लवकरच येणार लस, सीरम इंस्टिट्यूटकडून संशोधन सुरु, अदर पुनावालांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट 

9. चीनच्या इशाऱ्यानंतरही अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल, संतप्त चीनकडून तैवानच्या सीमेवर युद्धसराव सुरु, अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढण्याची शक्यता 

10. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 13 पदकं, भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाची 'सुवर्ण कामगिरी. तर, लॉन बोल्समध्ये महिलांना ऐतिहासिक सुवर्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
Sunil Kedar : 30 सप्टेंबरची मुदत संपली, सुनील केदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार? कारण समोर
नागपूरमधील काँग्रेस नेते सुनील केदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर? कारण समोर
Embed widget