एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 26 जुलै 2022 : मंगळवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. आजपासून 5जी फ्रिक्वेन्सी बँडच्या लिलावाला सुरुवात, अंबानींची जिओ, अदानी डेटा, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या प्रमुख कंपन्या स्पर्धेत

टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारत आज प्रगतीचं आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. आजपासून 5-जी स्पेक्ट्रमच्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव (5G Auction) करण्यात येणार आहे. एअरटेल (Airtel), अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

2. सत्तांतरानंतरची उद्धव ठाकरेंची सनसनाटी मुलाखत सकाळी साडेआठ वाजता एबीपी माझावर, फुटीर शिंदे गट आणि भाजपसंदर्भात अनेक गौप्यस्फोट

"परिवारातले समजून मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. समजा मी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात," असा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

3. शिवसेनेनंतर आता आदित्य ठाकरेंची युवासेना शिंदे गटाच्या निशाण्यावर, अनेक जिल्ह्यातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी  जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत

4. विनंतीनंतरही नव्या सरकारनं कामांवरची स्थगिती कायम ठेवल्यानं राष्ट्रवादी कायदेशीर लढाईच्या पवित्र्यात, उच्च न्यायालयात याचिका करणार

5. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस देशभर निदर्शनं करणार, मुंबईत मंत्रालयाच्या गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 26 जुलै 2022 : मंगळवार

6. बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाहीत, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, तर कामांना दिलेल्या स्थगितीविरोधात राष्ट्रवादी कोर्टात जाण्याची शक्यता

7. शिंदेंचा प्लॅन एस माझाच्या हाती, शिंदेंचं लक्ष पक्ष संघटनेवर, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकरांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याचा शिंदेंचा दावा, खोतकरांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

8. 90 टक्के भरलेल्या जायकवाडीच्या 18 दरवाजांमधून विसर्ग सुरु, तर विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा 

9. यंदाच्या अतिवृष्टीमुळे 8 लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराअभावी शेतकरी वाऱ्यावर, ओला दुष्काळ जाहीर करण्याची अजित पवारांची मागणी

10 .इंटरनॅशनल अॅडव्हर्टाईझिंग असोसिएशनचा पुरस्कार सोहळा संपन्न, एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांचा मीडिया पर्सन ऑफ दि इअर पुरस्काराने सन्मान, तर अभिनेता रणवीर सिंह आणि टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचाही गौरव 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Embed widget