Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 22 मार्च 2022 : मंगळवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Top 10 Maharashtra Marathi News :दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. निवडणुकांमुळं रोखून ठेवलेली इंधन दरवाढ अखेर आजपासून लागू, पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल 83 पैशांनी महागलं, युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलरच्या घरात
2. मराठी माध्यमांच्या अभ्यासक्रमात पहिलीपासूनच इंग्रजी शब्द आणि वाक्यांची ओळख, यंदापासून अभ्यासक्रमात बदल, द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती
3. एसटी महामंडळाचं विलिनीकरण होणार की नाही? राज्य सरकार उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार, तर एसटी संपावरुन विरोधक आक्रमक, सभागृहा चालू न देण्याचा इशारा
4. अधीश बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा टाळण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव, नोटीशीची मुदत संपत आल्यानं न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Narayan Rane : जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या नोटीसविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणे यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसची मुदत संपत असल्याचे नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली. महापालिकेच्या 'के-पश्चिम' विभागाकडून काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या 'अधिश' बंगल्यातील बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम पाडून टाका, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले.
5. दोन वर्षांनंतर रंगपंचमीसाठी नाशकातल्या पारंपरिक राहाडी सज्ज, प्रसिद्ध देवस्थानांचाही रंगोत्सव, तर साताऱ्यातल्या बावधनची बगाड यात्रेचं माझावर विशेष कव्हरेज
महाराष्ट्रात अनके ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करत रंग खेळला जातो. मात्र नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या भागात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिकमधील तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. रहाड म्हणजे भला मोठा भूमिगत हौद. या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो. मात्र यंदा नाशिकमध्ये डीजे वाजवण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वादाची शक्यता आहे. साईबाबांची शिर्डी आणि विठुरायाच्या पंढरीतही रंगपंचमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. रंगपंचमीनिमित्त साईंच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच सुवर्णरथ मिरवणूक निघणार आहे. तर तिकडे पंढरपूरमध्ये विठुरायाच्या रंगाचा डफ प्रदक्षिणा मार्गावर निघणार आहे. तसंच तुळजापुरात देखील आई भवानीला रंग लावून रंगपंचमीची सुरुवात झाली आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 22 मार्च 2022 : मंगळवार
6. अनेक आजारांवर मधमाशी उपचार पद्धती ठरतेय रामबाण उपाय, एकनाथ खडसेंची गुडघेदुखी गायब
7. 'आसनी' चक्रीवादळ अंदमान निकोबारमध्ये दाखल, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली
8. तब्बल 2 वर्षांनंतर महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या मार्गावर, चार जिल्ह्यात एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही, 19 जिल्ह्यांत काल 10 पेक्षा कमी रुग्णांची नोंद
9. 18 वर्षांवरील वयोगटासाठी बूस्टर डोस देण्याचा विचार, सूत्रांची माहिती, इतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं निर्णयाची शक्यता
10. यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट, जगभरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने केंद्राकडून राज्याला सतर्कतेचा इशारा, प्रेक्षकांना दिलेली परवानगीही रद्द होण्याची शक्यता