Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 02 ऑगस्ट 2022 : मंगळवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. अल कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी ठार, 9/11च्या हल्ल्याचा बदला पूर्ण, जो बायडेन यांची प्रतिक्रिया
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा (Al Zawahiri) खात्मा केल्याची घोषणा अमेरिकेने केली. अफगाणिस्तानची राजधानी काबूलजवळ (Kabul) असलेल्या एका सुरक्षित ठिकाणी अमेरिकेने ड्रोन हल्ला (US Drone Attack) करत जवाहिरीचा खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याची अधिकृत घोषणा केली. जवाहिरीने केलेली एक चूक त्याला महागात पडली आणि अमेरिकेने संधी साधली असल्याची माहिती समोर आली आहे.
2. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता, राज्यपालांच्या भेटीआधी शिंदे आणि फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला
3. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात आमनेसामने येण्याची शक्यता, संध्याकाळी 7 वाजता कात्रजमधील मठात शिंदे दर्शनाला जाणार. तर आदित्य ठाकरेंचीही याच वेळी कात्रजमध्ये सभा
4. ईडी कोठडीत असलेल्य राऊतांची आज त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होण्याची शक्यता
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची ईडीची कस्टडी (ED Custody) सुनावण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात काल सुनावणी पार पडली असून गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला. दरम्यान, संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान संजय राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार आहेत. आणि 9.30 नंतर ईडी त्यांच्या वकिलांसमोर चौकशी करणार आहेत.
5. मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यपालांकडून माफी, महाराष्ट्रभरातून रोष व्यक्त झाल्यानंतर राज्यपालांकडून माफीनामा
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 02 ऑगस्ट 2022 : मंगळवार
6. MPSC च्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल, 'गट अ ते गट क'च्या भरतीसाठी आता दोनच संयुक्त पूर्व परीक्षा होणार
7. आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवाद्यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणीची शक्यता
8. भारतामध्ये मंदीची शक्यता नाही, लोकसभेतील महागाईवरील चर्चेत निर्मला सितारामन यांना विश्वास, सुप्रिया सुळे आणि तृणमूलच्या खासदार काकोरी घोष यांच्याकडून अनोख्या पद्धतीने महागाईचा निषेध
9. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये 9 पदकं, चौथ्या दिवशी जुदोमध्ये एक रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई, तर वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरला कांस्य पदक
10. दुसऱ्या टी20 सामन्यात मकॉयच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांचं लोटांगण, 5 गडी राखून वेस्ट इंडिजचा विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी