(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जानेवारी 2021 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. रखडलेली नोकरभरती अखेर सुरु होणार https://bit.ly/3c7XiFk पहिल्या टप्प्यात आरोग्य आणि गृहखात्याच्या 13 हजार पदांसाठी भरती, महापोर्टलऐवजी चार कंपन्यांची निवड https://bit.ly/3a3mlaa
2. बाळासाहेब ठाकरेंच्या 95व्या जयंतीनिमित्त पुतळा अनावरणासाठी सत्ताधारी-विरोधक एकाच व्यासपीठावर, फडणवीसांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनेला चिमटा https://bit.ly/39Ykcw5
3. भाजप-शिवसेना युतीच्या काळात भाजपकडून 100 कोटींची ऑफर; राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचा दावा, भाजप प्रवेशासाठी फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलांनी ऑफर दिल्याचा आरोप https://bit.ly/3c3HovG
4.नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ घाटात जीप 70 फुट खोल दरीत कोसळली; सहा मजुरांचा जागीच मृत्यू https://bit.ly/39VbD5f
5. गुढीपाडव्यापर्यंत मुंबई कोरोनामुक्त करणार, महापौर किशोरी पेडणेकरांचा विश्वास, कोविन अॅपमधील त्रुटी दूर झाल्यानं लसीकरणातही वाढ https://bit.ly/3oab24V
6. भाजप आमदार प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा https://bit.ly/3a3moTo
7. किसान सभेचं आंदोलन नाशिकच्या दिशेनं रवाना; अहमदनगरहून हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी, 25 जानेवारीला आंदोलन मुंबईत राजभवनावर धडकणार https://bit.ly/3iFkQmc
8. कोट्यावधीच्या कर्जाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; सांगलीच्या बेळंकी गावातील घटना, शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं टोकाचं पाऊल https://bit.ly/3sPg8Hh
9. पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं तरुण-तरुणीचा मृत्यू; 15 जणांना चावा, साताऱ्यातल्या जकातवाडी आणि डबेवाडीतील घटना https://bit.ly/3qI72Kw
10. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी बंगालमध्ये राजकारण तापलं; पदयात्रेद्वारे ममता बॅनर्जींचं शक्तिप्रदर्शन, पराक्रम दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदीही कोलकाता दौऱ्यावर https://bit.ly/39aNpop तर मोदींच्या उपस्थितीत व्यासपीठावर ममता बॅनर्जी नाराज, भाषण देण्यास नकार https://bit.ly/363rmhK
ABP माझा स्पेशल :
- आता गुन्हा न करताच जेलवारी! 26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात 'जेल-पर्यटन' सुरु होणार https://bit.ly/39Zgv9w
माझा ब्लॉग
- BLOG| लसीकरणाचा आकडा वधारतोय! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/39WkovR
- BLOG| आजकालच्या तरुणाईचं 'इन्स्टा लाईफ', एबीपी माझाच्या प्रतिनिधी अदिती पोटे यांचा लेख https://bit.ly/2Y6r7hl
माझा कट्टा
राम मंदिरासाठी का केलं जातंय निधी संकलन? कधी बांधून होणार अयोध्येचं मंदिर? या प्रश्नांची उत्तरं थेट श्री राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराजांकडून, आज रात्री 9 वाजता 'माझा कट्ट्यावर'
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv