Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 एप्रिल 2021 | सोमवार | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडींता आढावा एका क्लिकवर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 एप्रिल 2021 | सोमवार | ABP Majha
1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल किंवा त्यानंतर राज्यात लॉकडाऊनचा निर्णय, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्ससोबतच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती,
2. लॉकडाऊनच्या भीतीनं परप्रांतीय मजूर पुन्हा गावच्या दिशेनं, रविवारी रात्री कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तुफान गर्दी, चाकरमानीही कोकणच्या दिशेनं रवाना,
3. हातावर पोट असणाऱ्यांची सर्वप्रथम व्यवस्था करा आणि मग लॉकडाऊनचा निर्णय घ्या, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं आवाहन,
4. रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड, नाशिकमध्ये डॉक्टरकडूनच 25 हजार रुपयांना तीन रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री, पोलिसांकडून संशयित डॉक्टरला अटक,
5. रेमडेसिवीरचा होणारा तुटवडा पाहता केंद्राचा मोठा निर्णय, इंजेक्शनसाठी नागरिकांच्या रांगा असल्यामुळं रेमडेसिवीरची निर्यात तात्पुरती थांबवली,
6. पुण्यात आजपासून औषधांच्या दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री बंद, काळाबाजर रोखण्यासाठी प्रशासनाचं पाऊल
7. भारतात आणखी एका कोरोना लसीच्या वापराला मिळणार परवानगी, येत्या दहा दिवसांत दिली जाणार परवानगी, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती,
8. कोरोनाचा वाढता धोका पाहता मुंबईत आणखी 4 कोविड सेंटर आणि 5800 बेड्सची व्यवस्था, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती,
9. महाराष्ट्रातून दिल्लीत येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य, 72 तासांचा कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक, अन्यथा 14 दिवस क्वारंटाईन,
10. भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन निर्मात्यांच्या संघटनेकडून मोठा निर्णय, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर सर्वांची दर 15 दिवसांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय