एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नियमित दर बदल : मुंबईतील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?
![नियमित दर बदल : मुंबईतील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय? Todays Petrol Diesel Rates In Mumbai Latest Updates नियमित दर बदल : मुंबईतील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/15224238/oil-petrol-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिले दोन दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत आज पेट्रोल 12 पैशांनी, तर डिझेल 22 पैशांनी स्वस्त झालं आहे.
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल 1.12 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची कपात झाली होती.
आता रात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून पेट्रोल, डिझेलचे दर बदलणार
विविध शहरातील हे दर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहतील. त्यानंतर नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलतील.
पाच शहरात यशस्वी प्रयोग
कच्च्या तेलाचे दर नियमित ठरतात, त्यामुळे भारतातही दररोज दरात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये हा नियम अगोदरपासूनच लागू आहे. तेल कंपन्यांनी उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगड आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये प्रायोगिक तत्तांवर दररोज दर बदलण्याचा नियम लागू केला. या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशभरात हा नियम लागू करण्यात आला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion