Todays Headline 6th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
आज रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा
आज रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. . गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. यंदा मात्र रायगड पुन्हा दुमदुमणार आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष, राजकीय घडामोडींवर नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आहे
सलमान आणि सलीम खानना धमकीचं पत्र..'सिद्धू मुसेवाला' करण्याची धमकी
सलमानचे वडिल सलीम खान यांना काल सकाळी जॉगिंगला गेले असता त्यांना ते बसलेल्या बेंचवर धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात सलमानचा मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरु आहे. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, कोरोनाचे वाढते आकडे आणि राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होणार
आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काल राज्यात 1494 नवीन रुग्णांचं निदान झालंय. याच अनुषंगाने मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा होणार आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार?
अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल केला आहे. नवाब मलिकही अर्ज सादर करणार आङे आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार
सकाळी 7 वाजता शेगावहून पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर, दुपारी 'श्री क्षेत्र नागझरी' येथे आगमन व पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावच्या या दिंडीच हे 53 वर्ष आहे. 700 भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी 750 किमी व पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशी ला पंढरपूर पोहचणार आहे.
उत्तरकाशीत बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू
उत्तरकाशीत डामटाजवळ प्रवासी बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सगळे प्रवासी मध्य प्रदेशातील होते. मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश सरकारनंही प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केलीये. बातमी चालतीये.
ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्षं पूर्ण
अमृतसर येथील ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दल खालसाकडून अमृतसर बंदचं आवाहन करण्यात आलंय. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातच्या दौऱ्यावर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ते मेहसाणा येथे तिरंगा रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर नागिरकांना संबोधित करणार आहेत.
गायक केके यांचं शेवटचं गाणं रिलीज होणार
गायक केके यांचं शेवटचं 'धूप पानी बहने दे' हे शेवटचं गाणं आज रिलीज होणार आहे. हे गाणं केकेनं गायलं आहे, गुलजार यांनी लिहिलं आहे तर शांतनु मोइत्रा यांनी कंपोज केलंय.