Todays Headline 5th July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येहवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर
राज्यात शिंदे - फडणवीस आल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरला जाणार आहे. नागपुरात फडणवीसांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर पोहचणार आहे. त्यानंतर फडणवीसांच्या घरापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे
व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता इतर 14 आमदारांवर कारवाईची मागणी
व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर 14 जणांची तक्रार करण्यात आली आहे.
संजय पांडे यांची ईडी चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. संजय पांडे यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलवले आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवस बिहार दौऱ्यावर
भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवस बिहार दौऱ्यावर आहेत.