एक्स्प्लोर

Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

National News : एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत असतो.

मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

एसटी कर्मचाऱ्यांना  कामावर हजर राहण्यासाठी आज शेवटची तारीख 

आज एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनानंतर कामावर हजर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शेवटची तारीख आहे.  93 हजार एसटी कर्मचाऱ्यांना पैकी 70 हजारांच्यावर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांना पैकी 70 हजारांच्यावर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. 

पोल-खोल रथावर झालेल्या दगडफेकीत प्रकरणी भाजपने पुन्हा एकदा 24 तासाचा अल्टिमेटम

पोल-खोल रथावर झालेल्या दगडफेकीत प्रकरणी भाजपने पुन्हा एकदा 24 तासाचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आज पोलिसांच्या वतीने प्रमुख आरोपींना अटक केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. 24 तासांपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपची काय रणनीती असेल हे बघावं लागेल.

 गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार

भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशातच गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  

 मंत्री नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी

 मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. मलिकांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. गुरूवारी वेळेअभावी सुनावणी झाली नाही.

हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईला रवाना होणार

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा  मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यासाठी राणाा दांमपत्य आज रात्री 8 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार आहे.

जहांगीरपुरीत झालेल्या हिंसाचारानंतर आज  नमाज पठण

जहांगीरपुरीत झालेल्या हिंसाचारानंतर आज  नमाज पठण करण्यात येणार आहे. यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस  सतर्क झाले आहेत. दोन्ही समाजाच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच जहांगीरपुरीतील जामा मशिदीने आज नमाज पठणासाठी लहान मुलांना न आणण्याचे आवाहन केले आहे. 

बारामुल्ला खोऱ्यात जहाल दहशतवाद्यासह पाच जणांना कंठस्नान

 जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी विरोधी कारवाईमध्ये झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा जहाल दहशतवादी  युसूफ दार उर्फ कांतरू यांचा समावेश आहे. ही चकमक बारामुल्ला परिसरात झाली असून सुरक्षा दलाच्या यशामुळे एक मोठा कट उधळल्याचं सांगितलं जातंय. अजूनही तीन-चार दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज भोपाळ दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज भोपाळ दौऱ्यावर आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हिमााचल दौऱ्यावर

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आजपासून दोन दिवस हिमाचल दौऱ्यावर आहेत. या वेळी एका रोड शो चे देखील आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यातील नड्ड यांचा हा दुसरा हिमाचल दौरा आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यत हैदराबाद हाऊस येथे बैठक होणार आहे. त्यानतर ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना देखील भेटणार आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी प्रशांत किशोर यांच्या उपस्थित बैठक

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या याचिकेवर सुनावणी

चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री  लालू प्रसाद यादव यांच्या जामीन याचिकेवर  झारखंड हायकोर्टात  सुनावणी होणार आहे. 

DC vs RR :  दिल्ली आणि राजस्थानमध्ये टक्कर

  दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये शुक्रवारी आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 34 वा सामना होणार आहे. वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली आणि राजस्थान यांच्यात मुकाबला होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर राजस्थानने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि राजस्थान संघाने आपल्या मागील सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. वानखेडे मैदानावर रंगणारा दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना रोमांचक होणार यात कोणतेही दुमत नाही.

आज इतिहासात

1915 - पहिल्या महायुद्धावेळी जर्मनच्या सेनेने पहिल्यांदा विषारी गॅसचा वापर केला होता.

1921 - नेताजी सुभआषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसची उच्चभ्रू नोकरी नाकारली

1958 - एडमिरल आर डी कटारी भारतीय नौसनेचे पहिले  भारतीय प्रमुख बनले

1970 -जगात पहिल्यंदा पृथ्वी दिवसाचे आयोजन करण्यात आले

1983 - अंतरिक्ष यान सोयूज टी-8 पृथ्वीवर परतले

2021 - युवा विश्व चॅपियनशिप फायनलमध्ये फायनलमध्यो पोहचलेल्या सात भारतीय महिलांनी सुवर्ण पदक जिंकले

2021 - ऐसी दिवानगी देखी नहीं कही, घुंगट की आड से या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणऱ्या नदीम - श्रवण यांच्यापैकी श्रवण राठोड यांचे निधन

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget