LIVE UPDATES | दिल्लीतील पार्श्वभूमीवर भिवंडी शाहीनबाग आंदोलनात पोलिस दाखल
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थ संकल्प सादर करणार, मंदी, बेरोजगारी, महागाईत गुरफटलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं आव्हान, अर्थसंकल्पाकडून देशाला मोठ्या आशा
2. जालना विनयभंग प्रकरणी मुख्य आरोपी आतिष खंदारेसह 5 जणांना अटक, माझाच्या बातमीनंतर तपास यंत्रणा कामाला, व्हायरल व्हीडिओवरुन राज्यभरात संताप
3. कोरेगाव-भीमाची चौकशी करणारं आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, सरकार पुरेशी सुविधा पुरवत नसल्याची तक्रार
4. मुस्लीम आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा, तर पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा काढण्याची जबाबदरी मुख्य सचिवांकडे
5. बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र, विद्युत विभाग परिवहन विभागाला पोसत असल्याचा ठपका, मुंबई मनपाकडून आरोपांचं खंडन
6. लागोपाठ दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये सुपर विजय; पालघरच्या शार्दूल ठाकूरचा मारा सामन्यात निर्णायक, मालिकेत 4-0 अशी आघाडी
एबीपी माझा वेब टीम