(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATES | कर्णबधिरांसाठी मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन होणार
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा की विरोध? सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर चर्चांना उधाण, तर एनआरसीवरुन राज्य आणि केंद्रात संघर्षाची चिन्ह
2. बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचा माफीनामा, मोर्च्यातल्या गर्दीसाठी हिरोईन आणण्याची भाषा, तसेच महिला तहसीलदारांवर आक्षेपार्ह टिप्पणी
3. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतलं विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं शिबीर रद्द केल्यानंतर आशिष शेलारांचा हल्लाबोल, बारमध्ये प्रशिक्षण वर्ग भरवा, मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
4. मुंबईतल्या एलजीबीटी समुदायाच्या रॅलीत शर्जिलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा किरीट सोमय्यांचा दावा, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून सखोल चौकशीची सोमय्यांची मागणी
5. जामिया विद्यापीठात रात्री पुन्हा एकदा गोळीबार, विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचवर गोळीबार, घटनेमध्ये कोणीही जखमी नाही
6. टीम इंडियाची न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी; अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीतही टीम इंडियाची यजमानांवर सरशी, मालिकेत 5-0 असं निर्विवाद वर्चस्व
ABP Majha LIVE | Live Streaming Of ABP Majha Marathi News | Marathi LIVE News
ABP Majha LIVE | Live Streaming Of ABP Majha Marathi News | Marathi LIVE News All Happenings of Maharashtra Subscribe to our YouTube channel here: https://ww...