LIVE UPDATE | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा उद्याच्या शपथविधीवर बहिष्कार
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...
1.दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, जीआरमधल्या पाचव्या मुद्यामुळं सरकार टीकेचं धनी, शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
2. उद्धव ठाकरे सरकारचा उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष
3. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार होते, विखे पाटलांचं विधान, तर अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही, बाळासाहेब थोरातांचं उत्तर
4. बेळगावमध्ये कर्नाटक नवनिर्माण सेनेचा उन्माद सुरुच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकृतीचं दहन, मराठी पाट्यांचीही तोडफोड
5. लखनौ पोलिसांनी गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा प्रियंका गांधींचा आरोप, पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियंका गांधी स्कुटीवरुन रवाना
6. ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवल्याप्रकरणी रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंगविरोधात बीडमध्ये गुन्हा, टीव्ही मालिकेतल्या आक्षेपार्ह विधानावर आक्षेप