Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थी, श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो उपवास...
आज कृष्ण पक्षातील भालचन्द्र संकष्टी चतुर्थी आहे. श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चना केली जाते.
Sankashti Chaturthi 2022 : आज संकष्टी चतुर्थी आहे. श्रीगणेशाचा आशिर्वाद मिळावा यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चना केली जाते. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षात एक अशा दोन चतुर्थी तिथी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. आज फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील भालचन्द्र संकष्टी चतुर्थी आहे. यावेळी संकष्टी चतुर्थी सोमवारी आली आहे. गणेशभक्त या दिवशी देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यानं मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नित्यकर्म आणि स्नान करून उपवासाचा संकल्प करावा. तसेच श्रीगणेशाची पूजा करावी. पूजेत गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन आणि मोदक अर्पण करावे. पूजा संपल्यानंतर गणपतीची आरती करावी आणि दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्रोदयापूर्वी पुन्हा गणेशाची पूजा करा आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडा.
संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
भालचन्द्र संकष्टी चतुर्थी : 21 मार्च 2022
पुजेचा शुभ मुहूर्त : 21 मार्च सकाळी 8 वाजून 20 मिनट ते 22 मार्च सकाळी 6 वाजून 24 मिनटापर्यंत
चंद्रोदय : रात्री 9 वाजून 47 मिनटांनी
श्रीगणेश हा पहिला उपासक मानला जातो. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नकारक आणि हितकारक म्हणूनही ओळखले जाते. चतुर्थीचा उपवास करुन आणि मनापासून भगवंताची आराधना केल्याने ते आपल्या भक्तांचे सर्व अडथळे दूर करतात. यासोबतच त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतात. चतुर्थीमध्ये चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील भालचंद्र संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी व्रत आणि नियमानुसार गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतात असे म्हटले जाते.
महत्त्वाच्या बातम्या: