एक्स्प्लोर
तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान
मुंबई : देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी अतूर झाले आहेत आणि आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत. आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात.
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचं पथकही सोबत असणार आहे. त्यामुळे आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून जाईल. तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement