एक्स्प्लोर

10th December Headlines: दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचे संकट, जळगाव दूध संघासाठी मतदान; आज दिवसभरात

Today's 10 December Top Headlines: तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर मंदोस चक्रीवादळाचे संकट घोंगावत असून या राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबई: दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मंदोस (Cyclone Mandos) या चक्रीवादळाचं संकट घोंगावत असून तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जळगाव दूध संघासाठी आज मतदान होणार आहे. यासह आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात. 

मंदोस चक्रीवादळाचे संकट 

दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचं (Cyclone Mandos)  संकट घोंगावत आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. या तिन्ही राज्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. तिन्ही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुफान वाऱ्यासह समुद्र किनाऱ्यावर पाऊस कोसळत आहे. अस्मानी संकटामुळे प्रशासन सतर्क झालं असून एनडीआरएफसह इतर पथके तैणात करण्यात आली आहे. दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या मंदोस चक्रीवादळाचा फटका शेजारी असणाऱ्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळमधील हवामानात बदल झालाय. महाराष्ट्र, गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

आमदार निलेश लंकेंच्या उपोषणाचा चौथा दिवस

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी पाटील, सुपा, या ठिकाणी रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आलंय 

जळगाव दूध संघासाठी आज मतदान 

जळगाव दूध संघातील (Jalgaon Milk) वीस जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दूध संघाच्या निवडणुकीसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन 

कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधातही हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Embed widget