एक्स्प्लोर

ठाणे झेडपी निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष

एकूण 53 जागांपैकी 26 जागांवर विजय मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप 14 आणि राष्ट्रवादीने 10 जागा मिळवल्या आहेत.

ठाणे : शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण 53 जागांपैकी 26 जागांवर विजय मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप 14 आणि राष्ट्रवादीने 10 जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेने अंबरनाथ आणि शहापूरमध्ये राष्ट्रावादीशी युती केलेली आहे. या दोन्हीही ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निकालामध्ये काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालेली दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. जिल्हा परिषदचा अंतिम निकाल : एकूण जागा - 53
  • शिवसेना - 26
  • भाजपा - 14
  • राष्ट्रवादी - 10
  • काँग्रेस - 1
  • अपक्ष - 1
तालुकानिहाय निकाल - अंबरनाथ : जिल्हा परिषद गट - एकूण जागा 4 :
  • शिवसेना-राष्ट्रवादी युती 3
  • भाजपा 1
पंचायत समिती -  एकूण जागा ८ :
  • शिवसेना-राष्ट्रवादी युती 7
  • भाजप 1
कल्याण तालुका : जिल्हा परिषद गट – एकूण जागा 3 :
  • शिवसेना 3
  • भाजप 3
पंचायत समिती – एकूण जागा १२ :
  • भाजप 5
  • शिवसेना 4
  • राष्ट्रवादी 3
  मुरबाड तालुका : जिल्हा परिषद गट - एकूण जागा 8 :
  • भाजप 4
  • राष्ट्रवादी 3
  • शिवसेना 1
पंचायत समिती – एकूण जागा 16 :
  • भाजपा 10
  • राष्ट्रवादी 5
  • शिवसेना 1
शहापूर तालुका : जिल्हा परिषद गट - एकूण जागा 14 : (शिवसेना राष्ट्रवादी युती)
  • शिवसेना 9
  • राष्ट्रवादी 5
पंचायत समिती -  एकूण जागा 28 :
  • शिवसेना 18
  • राष्ट्रवादी 6
  • भाजप 3
  • अपक्ष 1
भिवंडी तालुका : जिल्हा परिषद गट – एकूण जागा 21 :
  • शिवसेना 10
  • भाजप 6
  • काँग्रेस 1
  • राष्ट्रवादी 2
  • अपक्ष 1
  • एक निकाल राखीव
पंचायत समिती – एकूण जागा 42 :
  • शिवसेना 19
  • भाजप 17
  • काँग्रेस 2
  • मनसे 1
  • राष्ट्रवादी 1
  • दोन निकाल राखीव
शहापूर तालुक्यात सेनेची जोरदार मुसंडी, तर भाजपचा धुव्वा  शहापूर तालुक्यात अद्याप मोजणी सुरु असून जिल्हा परिषदेच्या ११ गटांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी युतीने ६ जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या २२ जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी युतीने आत्तापर्यंत १० जागांवर विजय मिळवला आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपाला धक्का दिल्याचं पाहायला मिळतं आहे. --------- आत्तापर्यंत शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे.  पण बहुमतासाठी अजूनही ३ जागा कमी आहेत. जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २७ जागा आवश्यक असून अंबरनाथ आणि शहापूर तालुक्याप्रमाणे जिल्हा पातळीवर शिवसेना-राष्ट्रवादी युती झाल्यास सत्ता सहज मिळू शकेल. आत्तापर्यंत अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याचा निकाल जाहीर झाला असून त्यात शिवसेनेनं बरीच आघाडी घेतली. अंबरनाथ पंचायत समितीच्या आठपैकी ७ जागा शिवसेना-राष्ट्रवादी युतीने जिंकल्या आहेत. तर जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ३ गटातही शिवसेना-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ जागांपैकी शिवसेना आणि भाजपानं ३-३ जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १२ जागांपैकी भाजपने ५, शिवसेनेनं ४ आणि राष्ट्रवादीनं ३ जागा जिंकल्या आहेत. अंबरनाथ आणि शहापूर तालुक्याप्रमाणे कल्याणमध्येही शिवसेना-राष्ट्रवादीची युती झाली, तर पंचायत समिती भाजपच्या ताब्यातून जाऊ शकते. तिकडे भिवंडी तालुक्यात आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेनं ६ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. तर भाजपाने ३, अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी १ जागा जिंकली आहे. ----- जिल्हा परिषद निकाल : शहापूर - जिल्हा परिषद मळेगाव गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र विशे विजयी कल्याण तालुका जि.प.गट एकूण - ६ शिवसेना - ३ भाजपा - ३ अंबरनाथ तालुका जि. प. गट एकूण -  शिवसेना - ३ भाजपा -१ कल्याणच्या खोणी गटातून भाजपा आघाडीवर, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर संघर्षग्रस्त नेवाळीत शिवसेनेचा विजय नेवाळी जमिन बचाव आंदोलनाचे अध्यक्ष चैनू जाधव यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव विजयी जिल्हा परिषद अपडेट : ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं खातं उघडलं - बदलापूरच्या चरगाव गटातून शिवसेनेच्या पुष्पा पाटील विजयी - पंचायत समितीचे दोन गणही सेनेनं जिंकले भिवंडी जिल्हा परिषद गट निकाल गणेशपुरी - शिवसेना कांबा - शिवसेना खोणी - काँग्रेस ( बिनविरोध ) खारबाव - राष्ट्रवादी ( शिवसेना युती ) पंचायत समिती : कल्याण पंचायत समिती एकूण गण - १२ भाजपा - ५ शिवसेना - ४ राष्ट्रवादी - ३ अंबरनाथ पंचायत समिती एकूण गण - ८ शिवसेना - ५ राष्ट्रवादी - २ भाजपा -१ कल्याण - पिंपरी गणातून शिवसेनेचे भरत भोईर विजयी नेवाळी - नारीण गणातून शिवसेनेचे सुरेश पाटील विजयी - अंबरनाथ पंचायत समिती शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात, एकूण आठ जागांपैकी 8 जागांवर शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी - भाजपला मोठा धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने पंचायत समिती घेतली ताब्यात नगरपंचायत : धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा. निवडणूक निकाल- एकूण जागा १७ भाजप- ०९ काँग्रेस- ०६ इतर - ०२ नगराध्यक्षपदी भाजपच्या रजनी वानखेडे तीन हजार मताधिक्याने विजयी. नगरपरिषद : किनवट नगरपालिकेत भाजपाला बहुमत, 18 पैकी 9 जागा भाजपाकडे नगराध्यक्षपदी भाजपाचे आनंद मच्चेवार विजयी  राष्ट्रवादी 6, कॉंग्रेस 2 आणि एका जागेवर अपक्ष विजयी कोल्हापूर : हुपरी नगरपालिका निवडणूक अंतिम निकाल  नगराध्यक्ष पद - भाजपच्या जयश्री गाट विजयी भाजप - 7 ताराराणी जिल्हा विकास आघाडी - 5 मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडी - 2 शिवसेना - 2 अपक्ष - 2 मुंबई महापालिका पोटनिवडणूक : - कांदिवली (पश्चिम)  प्रभाग क्र. २१ च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर यांचा ७१२२ मतांनी विजय. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 65 टक्के मतदान झालं तर 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झालं. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली. ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांसाठी मतदान झाले. तसेच शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठीही मतदान झाले. दरम्यान, शेलार निवडणूक विभागातील मतदान केंद्र क्र. 38/6 वर फेरमतदान घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे शेलार निवडणूक विभाग तसेच शेलार निर्वाचक गण आणि कोलीवली निर्वाचक गणाची मतमोजणी पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्त पदासोबतच चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील काल मतदान झाले. या सर्व ठिकाणी मतमोजणी आज पार पडणार आहे. विविध जिल्ह्यांमधील 6 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आणि अध्यक्षपदासाठी काल मतदान झाले. नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेले मतदान असे : हुपरी (जि. कोल्हापूर) 85.18 टक्के नंदुरबार- 70.93 टक्के नवापूर (जि. नंदुरबार)- 66.34 टक्के किनवट (जि. नांदेड)- 77 टक्के चिखलदरा (जि. अमरावती)- 80.85 टक्के पांढरकवडा (जि. यवतमाळ)- 68.56 टक्के वाडा (जि. पालघर)- 72.79 टक्के शिंदखेडा (जि. धुळे)- 72.59 टक्के फुलंब्री (जि. औरंगाबाद)- 75.14 टक्के सालेकसा (जि. गोंदिया)- 89.65 टक्के सरासरी मतदान- 72.81 टक्के नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी : मैंदर्गी (जि. सोलापूर)- 71.83 टक्के शहादा (जि. नंदुरबार)- 63.50 टक्के अंबाजोगाई (जि. बीड)- 78.61 टक्के जिंतूर (जि. परभणी)- 64.42 टक्के मंगरूळपीर (जि. वाशिम)- 58.62 टक्के एटापल्ली (जि. गडचिरोली)- 74.37 टक्के मुंबईत एका जागेसाठी मतदान मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र.21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी काल 29 टक्के मतदान झालं. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget