एक्स्प्लोर
चंद्रपुरात आणखी एका वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एका वर्षात शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने वाघाचा झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिमूर तालुक्याच्या आमडी-बेगडे शेत-शिवारात वाघाचा मृतदेह सापडला.
शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ही घटना लपविण्यासाठी वाघाचा मृतदेह आसपासच्या झाडाच्या फांद्या आणि काटक्यांचा वापर करुन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या भागातील अनेक गावांमधील शेती जंगलाला लागून आहे. वन्य-प्राण्यांचा पिकातील धुमाकूळ हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेताच्या कुंपणाला वीजप्रवाह देऊन वन्य-प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले जाते.
आमडी-बेगडे शिवारातील विठ्ठल शिंदे या शेतमालकाने कुंपणात वीजप्रवाह सोडला होता. प्रवाहाचा वाघाला स्पर्श झाला त्यामुळे वाघाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचा गाजावाजा झाल्यावर वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. या घटनेनंतर शेतमालक कुटुंबासह पसार झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एका वर्षात शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने वाघाचा झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement