एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अहमदनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक
अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली असून. यात शिवसेनेचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे.
![अहमदनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक Throwing Stones on Uddhav Thackeray’s group of vehicles in Ahmednagar latest update अहमदनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/27155829/ahmednagar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली असून. यात शिवसेनेचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, आमदार विजय औटी यांचे विरोधक आमि पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके गटानं घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दगडफेकीच्या वृत्ताचं शिवसेनेकडून खंडन
'अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली असे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांवर येत आहे हे वृत्त चुकीचे असून अशी कोणतीही दगडफेक उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेली नाही. उद्धव ठाकरे कार्यक्रम संपल्यानंतर निघाले असताना मागील येणाऱ्या एका गाडीने अतिघाईत माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या अंगावर चुकून गाडी घातली. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यामुळे त्या गाडीची काच तुटली.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)