एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये श्रीहरी अणेंच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक

औरंगाबाद: विदर्भवादी आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या गाडीवर आज (23 मार्च) औरंगाबादेत दगडफेक करण्यात आली. मराठवाडा मुक्ती मेळाव्यासाठी श्रीहरी अणे औरंगाबाद मध्ये आले होते. यावेळी सेनेनं त्यांच्याविरोधात निदर्शनं केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत अणेंच्या गाडीवर हल्ला केला. महसूल प्रबोधनी सभागृहाबाहेर शिवसेनेनं अणेंविरोधात जोरदार आंदोलन करत सुरुवातीला त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मात्र, शिवसैनिकांनी अणेच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं आहे.
आणखी वाचा























