एक्स्प्लोर
Advertisement
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीच्या विटा शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सांगली : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीच्या विटा शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सांगलीच्या विटा येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विटा पोलिसांत दाखल झाली होती. बेपत्ता झालेली मुलगी विटा पोलिसांना सापडली असून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विटा येथील तीन तरुणांनी या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा जवाब पीडित मुलीने पोलिसांना दिला आहे.
याप्रकरणी विटा पोलिसांनी सत्यजित पवार, शुभम शिंदे आणि रितेश लोंढे या तिघांना अटक केली आहे. या तिघांनी पीडित अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कडेगाव येथील एका लॉजवर नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी तीनही नराधमांवर विटा पोलिसांनी अपहरण आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तीनही नराधमांना सांगली येथील विशेष न्यायालयात हजर केले असता या तिघांना 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पॉक्सो कायद्यामध्ये बदल करण्यात आला. या कायद्यांतर्गत मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात बदललेल्या पॉक्सोअंतर्गत हा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement