एक्स्प्लोर
सांभाळून राहा, खडसेंना आफ्रिकेतून धमकी
याप्रकरणी एकनाथ खडसेंनी पोलिसात तक्रार दिली असून पोलीस चौकशी करत आहेत.
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. खडसे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांच्या मोबाइलवर अज्ञातांनी फोन करून संभाळून राहा, अशा आशायची धमकी दिल्यासंदर्भात, खडसेंनी पोलिसात तक्रार केली आहे.
पोलिसांनी कॉलचा तपास केला असता कॉल करणाऱ्याचं लोकेशन हे पूर्व आफ्रिकेतील भुरांडी या देशातून आल्याचं समोर आलं. गेल्या काही दिवसांपूर्वी खडसेंच्या विरोधक अंजली दमानियांनी पाकिस्तानातून धमकीचे फोन आल्याचा दावा केला होता आता खडसेंना आफ्रिकेतून धमकीचा फोन आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे.
खडसेंना गेल्या तीन दिवसात पाच वेळा ‘संभलके रहना’ अशा आशयाची धमकी देण्यात आली. कुणाचा तरी खोडसाळपणा म्हणून खडसेंनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र तीन दिवसात पाच वेळा फोन आल्याने खडसेंनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लोकेशन काढलं असता हा फोन आफ्रिकेतील भुरांडी या देशातून आला असल्याचं समोर आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement