एक्स्प्लोर
चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, साहित्यिक सुभाष देसाईंना धमकी

कोल्हापूर : कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला विरोध करु नका, अन्यथा तीन गोळ्यांनी ज्याप्रकारे अचूक वेध घेतला, तसं चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. तसंच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई थोडक्यात बचावल्या, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, या पत्रामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. डॉ. देसाई यांनी या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात तक्रार नोंदवली असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय लिहिलं आहे पत्रात? महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णूपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला हे सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहा, कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही. एक हितचिंतक
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















