एक्स्प्लोर

महाराष्ट्र्रातील हजारो तरुण धुंदीच्या गोळ्यांच्या आहारी

'माफ करा भावांनो...' फेसबुकवर अशी पोस्ट टाकून इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट धैर्यशीलनं रेल्वेखाली जीव दिला. अवघा महाराष्ट्र बंद असतानाही धैर्यशीलला हव्या त्या गोळ्या, हव्या तेवढ्या मिळाल्या.

उस्मानाबाद : महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरातली तरुणाई मेडिकलच्या दुकानात मिळणाऱ्या 'धुंदीच्या गोळ्यां'च्या आहारी गेली आहे. 'एबीपी माझा'च्या टीमने ही बाब पोलिसांपर्यंत पोहचवली. पोलिसांच्या तपासात या शहरात रोज हजारोंच्या संख्येनं गोळ्या विकल्या जात असल्याचं समोर आलं. दुर्दैवाची बाब म्हणजे आमच्याकडे ही माहिती मिळेपर्यंत एका तरुणानं आत्महत्या केली होती. दोन तरुणांना सरकारी रुग्णालयात दाखल करावं लागलं. महाराष्ट्र सरकारला 'एबीपी माझा'चं आव्हान आहे, अशा शहरांचा शोध घेऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या देणाऱ्यांवर कारवाई करा. 'माफ करा भावांनो...' फेसबुकवर अशी पोस्ट टाकून इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट धैर्यशीलनं रेल्वेखाली जीव दिला. अवघा महाराष्ट्र बंद असतानाही धैर्यशीलला हव्या त्या गोळ्या, हव्या तेवढ्या मिळाल्या. धैर्यशीलचं कुटुंब सुखवस्तू... वडील एसटी महामहामंडळात कंट्रोलर... दहा एकर बागायती शेती... अभ्यासात हुशार असलेल्या धैर्यशीलला झोपेच्या गोळ्यांचं व्यसन जडलं. गेल्या वर्षी 5 मे रोजी गोळ्या खाऊन धैर्यशील कोमात गेल्यावरच घरच्यांना धैर्यशीलचं व्यसन कळलं. दोन महिने उपचार केल्यावरही धैर्यशील पुन्हा धुंदीच्या गोळ्यांच्या आहारी गेलाच... नशेतच 3 जानेवारीला रेल्वेखाली झोकून देत धैर्यशीलनं जीव दिला.. वीस दिवसांपूर्वी 'एबीपी माझा'पर्यंत धैर्यशीलच्या कुटुंबाची आपबिती आली. पोलिसांना माहिती देऊन एबीपी माझाच्या टीमनं धुंदीच्या गोळ्यांचा बाजार शोधायला सुरुवात केली. दोनच दिवसात गोळ्याच्या आहारी गेलेल अनेक तरुण दिसू लागले. अभय... वय वर्षे 19... अभयनं काही वर्ष व्यायाम करुन मजबूत शरीरयष्टी कमवली. पोलिसात भरती होण्याचं अभयचं स्वप्न. पण धुंदीच्या गोळ्यांचं व्यसन लागलं... शेतमजूर आई वडीलांचा हा एकुलता एक मुलगा. गोळ्यांसाठी हातावर ब्लेडनी वार करुन घेऊन स्वतःला जखमी करुन घेऊ लागला. जीव देण्याची सतत धमकी देणाऱ्या अभयला मित्रांनी धरुन ठेवलं. पोलिसांना कळवलं. पोलिसांनीच अभयला सरकारी रुग्णालयात भरती केलं. प्रवीण... वय वर्षे 25... प्रवीणला दोन वर्षांपासून गोळ्यांचं व्यसन जडलं. नशेबाजीमुळे इंजिनिअरिंग सुटलं... प्रवीणची आई धुणी-भांडी करते. वडील पिठाची चक्की चालवतात. प्रविणला रोज तीन गोळ्या खाल्ल्याशिवाय चालता येत नाही. या गोळ्या मुलांच्या मेंदूवर आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करतात. अँक्झायटी, डिप्रेशन, झोप न येणे या आजारांवर या गोळ्यांचे उपचार होतात. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय या गोळ्या मिळत नाहीत. तरीही हे तरुण ज्या शहरात राहतात तिथे हजारोंच्या संख्येनं गोळ्या दिल्या, घेतल्या आणि खाल्ल्या जात आहेत. धुंदीच्या गोळ्यांचा असा वापर महाराष्ट्रातल्या अनेक शहरात, सर्व स्तरात सुरु आहे. प्रश्न आहे तो अश्या गोळ्या विकणाऱ्यांचा, सप्लाय करणाऱ्या कंपन्यांचा... या मंडळींना जरब बसेल अशी कारवाई झाली नाही तर आणखी किती धैर्यशील जीव देतील, हे सांगता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Embed widget