एक्स्प्लोर
जनधन खात्यातून लाखोंचा परस्पर व्यवहार, शेतकरी अनभिज्ञ!
एकंदरीत शेतकऱ्याला अंधारात ठेवून, त्याच्या जनधन खात्यावरुन परस्पर लाखोंचे व्यवहार केले जाता. यात बँकेचे अधिकारीही नीट उत्तर देत नाहीत किंवा खामगाव पोलीसही काही सांगायला तयार नाहीत.
बुलडाणा : केंद्र सरकारने जनधन खाते उघडून सामान्य जनतेला आधार देण्याची योजना आणली. परंतु या जनधन खात्याचा गैरवापर बॅंकेचे अधिकारी कर्मचारी करुन लाखोंचा गैरव्यवहार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यातील जळका भडंग येथे उघडकीस आला. गणेश सुडोकार या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 50 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
बुलडाण्यातील जळखा भडंग येथील गणेश सुडोकार यांच्याकडे दोन एकर शेती असून, वार्षिक उत्पन्न केवळ 30 हजार एवढे आहे. मोलमजुरी करुन साळोकार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गावात एक-दोन खोलीची झोपडी आहे.
सुडोकार यांचं पंजाब नॅशनल बँकेत त्यांचं जनधन खाते आहे आणि या बँकेच्या नोंदीत गणेश सुडोकार हे गरीब नव्हे, तर लखपती आहे.
18 सप्टेंबर 2015 रोजी गणेश सुडोकार यांनी पंजाब नॅशनल बँकेत खाते उघडलं होतं. या खात्यातून 50 लाखाचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे जनधन खाते उघडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून गणेश सुडोकार यांना बँकेकडून पासबुकच देण्यात आले नव्हते. मात्र ज्यावेळी सुडोकारांच्या घरी क्रेडिट कार्ड आलं, त्यावेळी खात्यातील एन्ट्री पाहून त्यांना धक्का बसला. कारण त्यात एक किंव दोन हजाराच्या नव्हे, तर दहा हजरांच्या शेकडो एन्ट्री दिसल्या.
गणेश सुडोकारांना यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. बँकेतून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आले, त्यानंतर सुडोकारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांकडूनही काहीच हालचाली होत नाहीत.
तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, असे गणेश सुडोकारांना पंजाब नॅशनल बँकेकडून कळवण्यात आले. विशेष म्हणजे, ते पत्रही बँकेचं अधिकृत नाही. कारण त्यावर बँकेचा जावक क्रमांक नाही किंवा बँकेच्या आऊटवर्ड रजिस्टरमध्येही त्याची नोंद नाही. एबीपी माझानेही यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारले. मात्र त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
एकंदरीत शेतकऱ्याला अंधारात ठेवून, त्याच्या जनधन खात्यावरुन परस्पर लाखोंचे व्यवहार केले जाता. यात बँकेचे अधिकारीही नीट उत्तर देत नाहीत किंवा खामगाव पोलीसही काही सांगायला तयार नाहीत.
एबीपी माझाने बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात विचारले. मात्र त्यांनी चौकशीचे आश्वास दिले, मात्र ते कॅमेऱ्यासमोर सांगण्यास नकार दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement