एक्स्प्लोर
Advertisement
'या' दिग्गजांनी वाहिली डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली
घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होत. त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्या निधनानं कलाकारांपासून राजकारण्यांनीही शोक व्यक्त केला आहे.
मुंबई : मराठी रंगभूमीवर नटसम्राटची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं निधन झाल आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. नटसम्राटसारखं नाटक असो किंवा सिंहासन, सामनासारखे चित्रपट असो, आपल्या कसदार अभिनयानं सिनेसृष्टीत त्यांनी वेगळी छाप पाडली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होत. त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्या निधनानं कलाकारांपासून राजकारण्यांनीही शोक व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ अभिनेता श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवर, सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
शरद पवार
वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खासदार सुप्रिया सुळे
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. रंगभूमी,चित्रपट या क्षेत्रात त्यांचे अतुलनिय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अर्थमंत्री जयंत पाटील
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सुभाष देसाई (सांस्कृतिक मंत्री)
मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो.
' एका नटसम्राटाची एक्झिट': सुधीर मुनगंटीवार
नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागु यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली असल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ श्रीराम लागु यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा डॉ. लागुंनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोचवली. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक कलावंतासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले .. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीची तसेच हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
सत्यजित तांबे
पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अजित पवार
आपल्या अभिनयानं मराठी नाटकं आणि चित्रपटांतून रसिकांना मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. समाजभान जपणारं, आयुष्यभर विवेकवादी विचारांची कास न सोडणारं एक उमदं व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Shreeram Lagoo | रंगभूमीवरील नटसम्राट काळाच्या पडद्याआड | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement