एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रत्नागिरी गॅस, विद्युत प्रकल्पातील कोट्यवधी किंमतीचे पार्ट चोरीला

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील 'रत्नागिरी गॅस आणि विद्युत' प्रकल्पातील कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या मशिनचे पार्ट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पातील पॉवर ब्लॉकमधील टर्बाईन रोटरचे काढून ठेवलेले तब्बल सहा ब्लेड चोरीला गेले आहेत. चोरलेले हे पार्ट भंगारात विकण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर गुहागर जवळच्याच पालपेणे गावातील जंगली भागात हे पार्ट लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या पॉवर ब्लॉकमध्ये तीन टर्बाईन आहेत. त्यामध्ये 2  A, 2 B असे प्रत्येकाचे दोन-दोन रोटर आहेत. या टर्बाईनच्या देखभालीचे  काम जीइ या कंपनीकडे आहे. गेल्या महिन्यात टर्बाईनची दुरुस्ती झाल्यानंतर टर्बाईन मधील रोटरचे काढलेले ९२ ब्लेड पॉवर ब्लॉकमधील रूमच्या मागे ठेवण्यात आले होते. जीइचे अभियंते कंपनीत पुन्हा कामावर आल्यानंतर त्यांना ९२ पैकी ८६ ब्लेड दिसले. गुरुवार रात्रीपासून कंपनीत या ब्लेडचा शोध सुरु होता. यातील एका ब्लेडची किंमत २० ते २५ लाखाच्या घरात असावी असा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पात झालेल्या या चोरी विषयी कंपनीकडून कोणतीच माहिती दिली जात नव्हती. पण आज गुहागर जवळच्या पालपेणेच्या जंगलात हे पार्ट आढळून आले आहेत. प्रत्यक्ष कंपनीच्या आवारातील इतके महत्वाचे पार्ट कंपनीची इतकी मोठी सुरक्षा भेदून बाहेर आलेच कसे? हा सवाल आता उपस्थित होतो आहे. या कंपनीच्या चारही बाजूला सीआयएसएफच्या बंदुकधारी रक्षकांचं मोठं कडं असतं. ही सगळी सुरक्षा यंत्रणा तोडून कंपनीच्या इतक्या महत्वाच्या भागाचे सहा पार्ट चोरीला कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. कंपनीच्या आणि सुरक्षा यंत्रणेच्या संगनमताशिवाय हे काम होऊच शकत नाही हे उघड आहे. आज गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई करत हे पार्ट जंगलातून ताब्यात घेतले आहेत. देशाच्या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पातील ही यंत्रणा अशा पद्धतीने बाहेर गेल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget