Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल
गणेशोत्सव सुरु होण्याआधीच गावाकडे विशेष म्हणजे कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षित केलं आहे.
रत्नागिरी : मागील वर्षी कोरोनाचा कहर देशात असा काही थैमान घालत होता, की सण उत्सवांवरही याचं सावट पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षीही चित्र फारसं वेगळं नाही. मागच्या वर्षी कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना गावी जाणं शक्य झालं नव्हतं. प्रशासनाचे नियम आणि कोरोनाचं संकट यांमुळं मुंबईकरांचा हिरमोड झाला होता.
मागील वर्षी बहुप्रतिक्षित अशा गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावाकडे जाता न आल्यामुळे अनेकांनीच यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सुरु होण्याआधीच गावाकडे विशेष म्हणजे कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षित केलं आहे. चार महिन्यांपूर्वीच गणेशोत्सवासाठी जाण्याच्या रेल्वे गाड्यांचं तिकीट बुक करत गावाला जाण्याचं अनेकांनीश निश्तित केलं आहे.
गणेशोत्सव काळात कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल्ल झालं आहे. या वर्षी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यासाठी 5 ते 9 सप्टेंबर दरम्यानच्या कोकणाकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. तर, घरगुती गणेश विसर्जनानंतर म्हणजेच 14 सप्टेंबरनंतर मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांचं आरक्षणही फुल्ल दिसत आहे.
In Pics : जब मिल बैठेंगे सब यार; LAC वर जाऊन खिलाडी कुमारनं घेतली जवानांची भेट
कोकणामधील काही भागात कोरोनाचं सावट सध्याही कायम आहे. यातच आता येत्या काळात इतक्या मोठ्या संख्यनेनं मुंबईतून नागरिक कोकणच्या दिशेनं येणार असतील तर, आरोग्य यंत्रेणेला फार आधीपासूनच यासाठी सतर्क राहावं लागणाल आहे. त्यामुळं नागरिकांनी कोरोना संकटाचं भान राखत योग्य ते निर्णय घ्यावेत आणि सण- उत्सव सामाजिक भान जपत साजरे करावेत. कारण, कोरोना संपलेला नाही, हेही तितकंच खरं.