एक्स्प्लोर
Advertisement
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, एकनाथ खडसेंचं भाकित
धुळे: ‘राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात.’ असं भाकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. ‘सरकारला तीन वर्ष झाली, सरकारने लोकोपयोगी कामंही केली. मात्र, केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं.’ असंही खडसे यावेळी म्हणाले. ते धुळ्यातील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आपल्याच पक्षाचं सरकार असताना मध्यावधीचं भाकित खडसेंनी केल्याने राजकीय वर्तुळासह विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या एकनाथ खडसे भाजपमध्ये एकाकी पडले आहेत. त्यातच त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं याबाबत बरीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी संघर्ष यात्रेवेळी विरोधकांनी खडसेंच्या फार्म हाऊसवर त्यांची भेट घेतली होती.
संबंधित बातम्या:
विरोधक-खडसे भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही: मुनगंटीवार
मुक्ताईनगरमध्ये खडसेंकडून विरोधकांचं स्वागत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement