एक्स्प्लोर
मुंबईकरांना दिलासा! महिनाभरात सक्रीय कोरोना रुग्णांच्या संख्येत 29 टक्क्यांनी घट
मुंबईत देखील गेल्या महिनाभरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत 29% नी घट झाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर मुंबईत देखील गेल्या महिनाभरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत 29% नी घट झाली असून आज मुंबईत केवळ 693 नवे रुग्ण सापडले आहेत. काल 897 रुग्ण सापडले होते. ही बाब दिलासा देणारी असली तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची नितांत गरज आहे
कशात घट झाली?
- सक्रीय कोरोना रुग्णसंख्या 29 % नं घटली
- सील इमारतींची संख्या 30 % ने तर कंटेंनटमेंट झोनची संख्या 13% ने कमी झाली आहे.
- कोरोना रुग्णसंख्या वाढीचा अर्धा टक्क्यापेक्षाही कमी झाला असून 1.06 वरुन 0.41 वर
- गंभीर रुग्णांची संख्याही 24% घटली
- महिनाभरात डबलींग रेट(रुग्णसंख्या दुपटीचा दर) 66 दिवसांवरुन 171 दिवसांवर
- मुंबईचा डेथ रेटही 4.4% वरुन 3.9% वर
कशात वाढ झाली?
- रिक्त कोविड बेडस्ची संख्या 4986 वरुन 7817 पर्यंत वाढली
- रिक्त आयसीयु बेडस्ची संख्याही 225 वरुन 561 पर्यंत वाढली
- ऑगस्टमध्ये दरदिवसाला होणा-या 6500 कोरोना टेस्ट होत होत्या आता त्यांची संख्या वाढून दर दिवसाला 14 ते 16 हजार टेस्ट होत आहे.
- डिस्चार्ज रेट 82% वरुन 89% पर्यंत वाढला
मुंबईत कोरोनाबाबत हा सकारात्मक बदल कशामुळे दिसला?
- माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला यश
- या अंतर्गत 34.9 लाख कुटुंबांना दोन वेळा भेटी दिल्या गेल्या. त्यांची प्रत्यक्ष वैद्यकिय तपासणी झाली.
- कोरोनाबाबत व्यापक जनजागृती मोहिम मुंबई महापालिकेनं हातात घेतली.
- या अंतर्गत नो मास्क नो एन्ट्री हा नियम सार्वजनिक वाहतूक साधने, आस्थापना, कार्यालये येथे लागू करण्यात आला
- मास्क न घालणा-यांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
- दीड लाख मुंबईकरांना मास्क न घालण्याबद्दल दंड करण्यात आला.
- महापालिकेकडून 244 मोफत कोविड चाचणी केंद्र उभारण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement