Nagpur Smart City : चौकातील एलईडी स्क्रीन ठरत आहे शोभेच्या वस्तू; स्मार्ट सिटीची जाहिरात योजना फसली; 51 चौकात डिस्प्ले
ज्या पध्दतीने जाहिरात होडिंग्ज नागरिकांचे लक्ष वेधून घेते, त्या तुलनेत एलईडीचा छोटा डिस्प्ले लोकांना आकषिंत करू शकले नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीची योजनाच फसल्याचे चित्र आहे.
Nagpur News : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासह जनहितार्थ संदेश तसंच शहरातील तापमान आणि पर्यावरणाची माहिती देण्यासाठी स्मार्ट सिटीने (Nagpur Smart City) शहरातील 51 चौकात वेरिएबल मेसेजिंग सिस्टम (एलईडी डिस्प्ले) लावण्यात आले आहेत. यातून जाहिरात देऊन महसूल मिळवण्याची योजना होती. मात्र, ही योजना फसत असल्याचे चित्र आहे. स्मार्ट सिटीचा हा पहिला प्रकल्प अपयशी ठरत आहे.
शुभसंदेशावर एका दिवसात 1 हजार
- या योजनेअंतर्गत कुठल्याही व्यक्तीस मित्र, कुटुंबीयातील सदस्याचा जन्मदिवस अथवा लग्नाचा वाढदिवस किंवा प्रतिष्ठानला शुभेच्छा देण्यासाठी जाहिरात देण्यासाठी एलईडी डिस्प्लेवर (LED Screen) दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- एखाद्या मोठया प्रतिष्ठानलाही वापरासाठी डिस्प्ले देण्याची योजना होती. यासाठी एक वा सर्व 51 डिस्प्ले वापरु शकत होते.
- जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या संदेशासाठी एका दिवसात एक हजार रुपये असं शुल्क आकारलं जाणार होतं. तर, व्यावसायिक जाहिरातीसाठी प्रति डिस्प्ले 850 रुपये शुल्क ठरवण्यात आलं होतं. काही व्यावसायिक जाहिरातीही सुरु झाल्या. त्यानंतर प्रतिसाद कमी झाला.
सरकारी संदेशच
कोट्यवधी रुपये खर्च करुन शहरातील अनेक भागात एलईडी डिस्प्ले लावण्यात आले. मात्र, आता या डिस्प्लेचा वापर केवळ सरकारी संदेशापर्यंत मर्यादित आहे. काही जागांवरील डिस्प्ले बंद झाले आहेत. स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प उत्तम होता. परंतु, नागरिकांचे लक्ष वेधण्यात कंपनी कमी पडली. ज्या पद्धतीने जाहिरात होर्डिंग्ज नागरिकांचे लक्ष वेधून घेते, एलईडीचा छोटा डिस्प्ले लोकांना आकषिंत करु शकले नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीची योजनाच फसल्याचे चित्र आहे.
नागपुरात या ठिकाणी लागलेत एलईडी डिस्प्ले
1) सावरकर नगर 2) शंकरनगर 3) लॉ कॉलेज चौक 4) लेडीज क्लब चौक 5) मोहम्मद रफी चौक 6) माटे चौक 7) आकाशवानी चौक 8) जीपीओ चौक 9) भोले पेट्रोल पंप चौक 10) आरबीआई चौक 11) वेरायटी चौक, 12) कोका कोला चौक 13) मॉरिस कॉलेज चौक 14) झांसी रानी चौक, 15) हिंगना टी पॉईंट 16) पुराना अमरावती नाका 17) नवीन काटोल नाका चौक 18) रविनगर चौक 19) पागलखाना चौक 20) जरीपटका चौक 21) इंदोरा चौक 22) कडबी चौक 23) कमाल चौक 24) ऑटोमोटिव्ह चौक 25) कलमना मार्केट चौक 26 ) भरतवाड़ा चौक 27) महावीर चौक 28) हसनबाग चौक 29) सोना रेस्टोरेंट चौ, 30) मेडिकल चौक 31) छोटा ताजबाग चौक 32) अग्रसेन चौक 33) मानस चौक 34) महालगी नगर चौक 35) जयस्तंभ चौक 36) दही बाजार चौक 37) प्रताप नगर चौक 38) पुराना काटोल नाका चौक 39) अशोक चौक 40) माउंट कार्मेल स्कूल चौक 41) रामनगर चौक 42)होटल प्राइड के सामने वर्धा रोड 43) मानकापुर क्रीडा संकुल 44) फुटाला तालाब चौक 45) गोरेवाडा चौक 46) के. टी. नगर काटोल रोड 47) दिघोरी चौक 48) क्रीडा चौक 49) गोंडवाना चौक 50) एलएडी चौक.
ही बातमी देखील वाचा