The Kashmir Files : केंद्र सरकारने 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा : अजित पवार
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar on Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशा चर्चा सुरू आहेत. राज्याने हा सिनेमा करमुक्त करण्यापेक्षा केंद्र सरकारने हा सिनेमा देशात करमुक्त करावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अखेर अजित पवारांनी यावर भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले,"राज्याने 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा करमुक्त करण्यापेक्षा केंद्र सरकारने हा सिनेमा देशात करमुक्त करावा."
"Centre govt must waive off GST on 'The Kashmir Files' movie instead of state making it tax-free," says Maharashtra Deputy CM Ajit Pawar in the State Assembly
— ANI (@ANI) March 16, 2022
(File pic) pic.twitter.com/x1ttBktbwZ
'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या सिनेमाला देशप्रेमींचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सिनेमा पाहवा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 50 कोटींचा आकडा पार केला आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमात काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने दाखवले आहेत. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. देशातील 7 राज्यांनी या चित्रपटाला करमुक्त घोषित केले आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
The Kashmir Files : शूटिंगमध्ये चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा! पाहा नेमकं काय झालं...
The Kashmir Files Box Office Collection Day 5 : बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?
Political Films : 'द कश्मीर फाइल्स'पासून 'उरी'पर्यंत हे राजकीय सिनेमे निवडणुकीदरम्यान झाले प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha