एक्स्प्लोर
कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात, तीन जणांची साक्ष बाकी
![कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात, तीन जणांची साक्ष बाकी The Final Phase Of The Hearing In Kopardi Rape Case The Rest Of The Testimony Of Three Men कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात, तीन जणांची साक्ष बाकी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/18094137/kopardi-ahmadnagar-court.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी खटल्याच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी तपास अधिकारी शिवाजी गवारे यांची महत्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी घटनेचा तपशील, साक्षीदार, पंच आणि एफआयआर संदर्भात साक्ष झाली.
पीडित मुलीच्या संदर्भातील विविध तपासण्यावर सर तपासणी झाली. आतापर्यंत 27 साक्षीदारांच्या साक्ष झाल्या असून आता केवळ तीन साक्षीदार तपासले जाणार आहेत.
दरम्यान आरोपींवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डीवायएसपीसह तब्बल 47 पोलीस अधिकारी आणि पोलीसांचं कडं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकार, इतर वकिल आणि अनोळखी व्यक्तींना सुनावणी कक्षात मनाई करण्यात आली होती. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रथमच मेटल डिटेक्टर बसवण्यात आलं आहे.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे.
संबंधित बातमी
कोपर्डी बलात्कार प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)