एक्स्प्लोर
अमरावतीतून मुंबईला पाठवला जाणारा मोठा शस्त्रसाठा जप्त, दोघे जेरबंद
ठाणे पोलिसांना शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.

मुंबई : मुंबईला पाठवण्यात येणारा शस्त्रसाठा जप्त ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. अमरावतीमध्ये ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई करत दोघांना अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली आहे. अमरावती येथून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे 10 पिस्तूल आणि 40 जिवंत काडतूसं सापडली आहेत. शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अशी या आरोपींची नावे आहेत. ठाणे पोलिसांना शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. 10 ते 70 हजार रुपयांपर्यंत या बेकायदेशीर शस्त्रांची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शस्त्रांसहित पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख 10 हजार रोकड आणि 10 मोबाईल जप्त केले आहेत. दोघे आरोपी बेकायदेशीर शस्त्र वापर आणि विकण्याचा व्यवसाय करत होते.
आणखी वाचा























