एक्स्प्लोर
कारवाई थांबवा, नाहीतर बेमुदत संप, पेट्रोलपंप डीलर्सचा इशारा

ठाणे : पेट्रोलपंपांवर पोलिसांनी सुरु केलेली कारवाई ही केवळ संशयाच्या बळावर आहे. अशाप्रकारची बेकायदेशीर छापेमारी न थांबवल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे. 'पोलिसांनी अमानवी पद्धतीने कारवाई सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून मारहाण करणं चुकीचं आहे. आम्ही चोर नाही. सर्व तपासणी झाल्यावरच कारवाई झाली पाहिजे. संशयास्पद गोष्टींमुळे पूर्ण पेट्रोल पंप बंद केला जात आहे', असं पेट्रोल डीलर्सच्या असोसिएशनने पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही 45 पेट्रोल पंपांचे मालक मंत्री गिरीश बापट यांना भेटलो आणि अमानवी प्रकार थांबवण्याची विनंती केली. पेट्रोल पंपाच्या मेंटेनन्सची बंद केलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करावी, अशी मागणीही केली. आमच्याकडे कर्मचारी घाबरले असून काम करायला तयार नसल्याचा दावाही असोसिएशनने केला. गिरीश बापट यांनी आम्हाला दोन-तीन दिवसात चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही आता इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांना विनंती करणार आहोत की तुम्हीच आमचे साहित्य तपासा आणि आम्हला क्लीन अँड क्लीअरचा टॅग दया, जेणेकरुन बाहेरील एजन्सी आमच्यावर असे छापे टाकणार नाही, असंही पेट्रोल डीलर्स असोसिएशनने म्हटलं.
संबंधित बातम्या
चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील
पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी
आणखी वाचा






















