एक्स्प्लोर

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन पाप केलं नाही, माझ्याच लोकांनी मला धोका दिला - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : माझ्याच लोकांनी मला धोका दिला पण ह्या दोन्ही पक्षांनी साथ दिली, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  

Uddhav Thackeray On Congress And NCP : मी काही पाप केलेलं नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन चुकीचे केलं नाही. माझ्याच लोकांनी मला धोका दिला पण ह्या दोन्ही पक्षांनी साथ दिली, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री महाविकास आघाडाची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वारंवार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन चूक केली, अशी टीका करण्यात येत होती. भाजपकडूनही यावरुनच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत होता. आता उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मी कोणताही चूक केली नाही, उलट माझ्या लोकांनी मला धोका दिला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाविकास आघाडाची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले उपस्थित होते. मविआमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भात चर्चा झाली. कसबा (Kasaba Election) आणि चिंचवडसंदर्भात (Chinchwad Election) विजय आणि पराभवावर चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.  यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप ही कीड आहे ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर कसबासारखे यांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करू शकतो. लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. कोणत्या जागा देण्याबाबत काही तडजोडी कराव्या लागल्या तरी कराव्यात. नाहीतर 2024 लोकसभा शेवटची निवडणूक असेल, जे निकाल आले ते हवे असेल तर सगळ्यांनी एकत्र लढले पाहिजे. 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. कोणत्या जागा देण्याबाबत काही तडजोडी कराव्या लागल्या तरी कराव्यात. नाहीतर 2024 लोकसभा शेवटची निवडणूक असेल. जे निकाल आले ते हवे असेल तर सगळ्यांनी एकत्र लढले पाहिजे. मी काही पाप केलेलं नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन चुकीचे केलं नाही. माझ्याच लोकांनी मला धोका दिला पण ह्या दोन्ही पक्षांनी साथ दिली. भाजप ही कीड आहे ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर कसबासारखे यांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा :

Sharad Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्यावर शरद पवार नाराज, मविआच्या बैठकीत राऊतांच्या वक्तव्यावर चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा Uncut

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget