Religious places Reopen | शाळांनंतर आता धार्मिक स्थळंही उघडणार?
Religious places Reopen : महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उघडली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Religious places Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. या दरम्यान, कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. दरम्यान, येत्या चार ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी
राज्यातील विद्यामंदिरंही उघडणार..
राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु (Schools Reopening) करण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.
राज्यात आज 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. राज्यात आज 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे. राज्यात आज 51 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 10 जिल्हे - यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि जळगाव, नांदेड, अमरावती आणि नागपूरचा ग्रामीण भाग जिथं शुक्रवारी एकही कोरोना संक्रित नवीन रुग्ण आढळला नाही. भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही शुक्रवारी एकही बाधित आढळला नाही.
अधिकारी म्हणाले की, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 691 नवीन प्रकरणे आहेत, तर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आणखी 446 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. सातारा जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर मुंबईत गेल्या 24 तासांत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.